....म्हणून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे इंदापूरच्या प्रशासनावर नाराज

bharne.jpg
bharne.jpg

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावामध्ये कोरोनाची साखळी तुटत नसल्याबाबत विचार केली असता अधिकारी निरुत्तर झाल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी; तर कोरोनाग्रस्तांना सुविधा मिळत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. 
इंदापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २४०० झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री भरणे यांच्या उपस्थितीमध्ये वालचंदनगरमध्ये तालुक्याची आढावा बैठक रविवारी (ता. २७) झाली. त्यावेळी भरणे यांनी अंथुर्णे गावामधील कोरोनाची साखळी का तुटत नाही? अशी विचारणा केली. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूरमधील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी जनरेटर उपलब्ध नाही. रुग्णांना बेडशिट व इतर सुविधा मिळत नाही. यासंदर्भात तहसीलदारांशी संपर्क साधल्यानंतर पैसे उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळत आहे. निमगावच्या कोविड सेंटरमध्येही रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी मिळत नसल्याचे गारटकर यांनी सांगितले. 

या बैठकीला प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, भिगवणचे पोलिस निरीक्षक जीवन माने, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रदीप टेंगल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गावडे, डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. प्रशांत महाजन आदी उपस्थित होते. 
दरम्यान, तातडीच्या उपाययोजना करून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगरण्याच्या सूचना भरणे यांनी दिल्या. अंथुर्णेमधील रुग्णांची साखळी तोडण्यासाठी एक दिवसाचा कंन्टेनमेंट झोन जाहीर करून सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी कांबळे यांनी सांगितले. 

इंजेक्शनचा तुटवडा 
इंदापुरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ५ रुग्ण व्हेटिंलेटरवर व ३८ रुग्ण ऑक्सिजनवर आणि निमगाव केतकीमधील कोविड सेंटरमध्ये १८ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहे. रुग्णांच्या तुलनेमध्ये तालुक्यामध्ये प्रशासनाकडे केवळ २५ रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध आहेत. एका ऑक्सिजनवरील एका रुग्णाला ५ इंजेक्शन द्यावे लागतात. इंजेक्शनचा तुटवडा असल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन विकत आणण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com