esakal | '...म्हणून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संयमाची भूमिका घ्यावी'
sakal

बोलून बातमी शोधा

'...म्हणून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संयमाची भूमिका घ्यावी'

- संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांचे आवाहन

'...म्हणून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संयमाची भूमिका घ्यावी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे :  सत्तेची लालसा असलेली जातीयवादी पक्षाची मंडळी 'सारथी' संस्थेच्या आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर राजकारण करीत पुरोगामी महाराष्ट्रात मराठा बहुजन समाजाच्या हातातील सत्ता खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संयमाची भूमिका घ्यावी, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय समन्वयक विकास पासलकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

"केवळ ओबीसी नेता असल्यामुळे मला वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मराठा द्वेष्टा असल्याची प्रतिमा निर्माण केली जात आहे. काहींना माझी बदनामी करायची आहे. सारथीबाबत माझी भूमिका दुटप्पी आहे, असे मराठा समाजाला वाटत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना भेटून सारथीचे काम एखाद्या मराठा नेत्याकडे देण्याची विनंती करणार आहे", असे वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी नुकतेच केले. 

हेही वाचा- 'या' कार्यकर्त्याची श्रद्धा पाहून शरद पवारही झाले नि:शब्द!

या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पासलकर म्हणाले, "सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व्हावेत, ही सर्व समाजबांधवांची इच्छा आहे. परंतु, त्याबाबत वडेट्टीवार यांच्याकडून पाहिजे तसे काम होत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहेत. त्यातून काही प्रतिक्रिया येतात. परंतु, त्याला कोणी जातीय रंग देऊ नये. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात हे आम्ही होऊ देणार नाही."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाचे म्हणून विरोध नाही. तर त्या ठिकाणी मराठा समाजाचा मंत्री असता तरीही समाजाची हीच भूमिका राहिली असती. काही जातीयवादी पक्ष याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर संयमाची भूमिका घेणे आवश्यक आहे. सारथीच्या विकासासाठी प्रयत्न आणि त्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री म्हणून त्याविरोधात प्रतिक्रिया आहे. त्यामुळे जातीय राजकारण करणाऱ्या मंडळींना संधी देऊ नये, असे आवाहन पासलकर यांनी केले.

loading image