मंत्री वळसे पाटील व डॉ. अमोल कोल्हे म्हणाले काळजी नको, सरकार तुमच्यासोबत!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील घोडेगाव परिसरातील गोनवडी, आमोंडी, कोलदरे, गंगापूर बुद्रुक, शिनोली येथील नुकसानग्रस्त शेतीची व इतर नुकसानीची पहाणी वळसे पाटील व डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवार (ता. 7) केली.

घोडेगाव : जिवापाड जपलेली आंब्याची 30 झाडे डोळ्यासमोर उनमळून पडली. झाडांचे आंबे गळून खाली पडले. वर्षभराचा खर्च कसा भागवणार. फळपिकांच्या नुकसानीची रक्कम बाजारभावाप्रमाणे द्या अशी मागणी गोनवडी (ता.आंबेगाव) येथील आंबा नुकसानग्रस्त शेतकरी मुरलीधर दौंड, ज्ञानेश्वर दौंड, शिवाजी गुळवे, भरत काळे यांनी राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे केली.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील घोडेगाव परिसरातील गोनवडी, आमोंडी, कोलदरे, गंगापूर बुद्रुक, शिनोली येथील नुकसानग्रस्त शेतीची व इतर नुकसानीची पहाणी वळसे पाटील व डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवार (ता. 7) केली. यावेळी शेतकऱ्यांनी मदतीची मोठी मागणी केली.

काम देत का कुणी काम : ओझी उचलू, कुठेही राबू पण...

आज सकाळी 10 वाजता गोनवडी येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा वळसे पाटील यांनी ऐकूण घेतल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती नंदकुमार सोनावले, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टी.के.चौधरी, अक्षय काळे, गोरक्ष मंडलीक उपस्थित होते.

यावेळी वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार व मी स्वतः मिटींग घेऊन आंबा, हिरडा, टोमॅटो, पोपई या फळांच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. भरपाईची रक्कम वाढवून देण्यासाठी 2015  च्या जी.आर. मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला शाॅक; `एवढे` झाले नुकसान...

दरम्यान, कोलदरे, आमोंडी, गंगापूर बुद्रुक, शिनोली येथील आंबा पिकांची पहाणी केली. पॉलीहाऊस, शेडनेटसाठी भरपाई दिली जाईल. तालुक्यातील सर्व बाधित शेतीचे पंचनामे तहसिलदार व कृषि अधिकारी यांनी त्वरीत करावे. अहवाल प्राप्त होताच रकमेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Walse Patil and Dr. Amol Kolhe inspects the damaged area