पवारसाहेबांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार : वळसे पाटील

manchar
manchar
Updated on

मंचर (पुणे) : राष्ट्र घडविण्यात हयात घालविणाऱ्या व महाराष्ट्राचं भूषण असणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांवर टिका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असून, टीका करणाऱ्यांचे नेतेही वेळेप्रसंगी पवारसाहेबांचा सल्ला घेतात, अशी टीका कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध वळसे पाटील यांनी ट्विटरद्वारे केला. ते म्हणाले की, राज्यासमोर सध्या अनेक प्रश्न आहेत, अशा वेळी कर्तृत्वशून्य खुज्या प्रवृत्तींनी सुधारून वागावे. गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सामाजिक स्वास्थ्य बिघडवू नये. या अपप्रवृत्तींचा जाहीर निषेध आहे.

दरम्यान, वळसे पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांच्या नेतृत्वाखाली पडळकर यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

या वेळी उद्याजोक किसनराव उंडे, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ, बाबासाहेब खालकर, रमेश खिलारी, अरुणा थोरात, सुषमा शिंदे, अंकित जाधव, माणिक गावडे उपस्थितीत होते. निकम व हिंगे यांनी पडळकर यांच्यावर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

After Bureaucratic Delay, TRTI Exam Coaching Restarts Across Maharashtra
Raj Thackeray on Nasrapur Case
Recruitment Exam Shock: SRPF Paper Sparks Allegations of Irregularities
Pune Crime News
Marathi News Esakal
www.esakal.com