नुकसानींचे पंचनामे करण्याच्या मंत्री वळसे पाटील यांच्या सूचना

भरत पचंगे
Tuesday, 20 October 2020

लवकरच शासन नुकसानग्रस्त शेतक-यांनी आर्थिक साहय्याचे निर्णय घेणार असल्याने त्यापूर्वी आपापले पंचनामे प्रक्रीया पूर्ण करुन घेण्याचे आवाहनही पवार यांनी केले.

शिक्रापूर : पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील सर्व शेती नुकसानींचे पंचनामे करण्याच्या सुचना कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या असून, शासनाची दुष्काळग्रस्त शेतक-यांची नुकसान भरपाईचे निर्णयही सरकार लवकरच घेणार असल्याची माहिती माजी सभापती प्रकाश पवार यांनी पाबळ (ता. शिरूर) येथे दिली.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती नुकसानी झालेल्या आहेत. ओला दुष्काळ सदृष्य स्थिती असल्याने पिकांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना राज्य सरकारचे वतीने कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

त्यानुसार पीक पंचनामे सुरू असून, शेतक-यांनी स्थानिक तलाठी व कृषी सहायक यांचेशी संपर्क साधून आपापल्या नुकसानग्रस्त शेती व पिकांचे पंचनामे करुन घेण्याचे आवाहन पवार यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, राज्य सरकारकडून सध्या महाराष्ट्रातील पिक पाहणी सुरू असून जेष्ठ नेत शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्वच महाआघाडीचे नेते महाराष्ट्रभर फिरुन नुकसानीचे आढावा घेत आहेत.

लवकरच शासन नुकसानग्रस्त शेतक-यांनी आर्थिक साहय्याचे निर्णय घेणार असल्याने त्यापूर्वी आपापले पंचनामे प्रक्रीया पूर्ण करुन घेण्याचे आवाहनही पवार यांनी केले.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

दरम्यान पाबळ, केंदूर, थिटेवाडी, हिवरे, मुखई, जातेगाव बुद्रुक आदी ठिकाणी सुरू असलेल्या पीक पंचनाम्याची पाहणीही पवार यांनी काल संपूर्ण दिवसभर केली. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Walse Patil's instructions to conduct a panchnama of damages