पुणे: किरकोळ वादातून एकाने मित्राच्या डोक्यात लोखंडी हत्यार आणि पाईपने वार करून खून केल्याची घटना मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील एका फार्म हाऊसवर घडली. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी...शिवशंकर मोहनमाड सिंह (वय ४७, रा. लक्ष्मी पार्क, कोलवडी, मांजरी रस्ता) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अतुल ज्ञानेश्वर सोनवणे (वय २७, रा. कोलवडी, पुणे) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी खुर्द येथील सिन्ना अंकल यांच्या फार्म हाऊसवरील खोलीत बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. शिवशंकर सिंह आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. रात्री त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. .MGNREGA: मनरेगा लाभार्थ्यांना दिलासा! सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट देणार, विधानसभेत घोषणा, आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला यश.त्याचा राग मनात धरून आरोपीने लोखंडी हत्याराने आणि पाईपने शिवशंकर यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने शिवशंकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सहदेव हवाले करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.