पुण्यात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; मित्राला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

पुण्यात १६ वर्षीय मुलावर त्याच्याच तरुण मित्राने अनैसर्गिक अत्याचार केला.

पुण्यात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; मित्राला अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुण्यात अल्पवयीन मित्रावर तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलावर स्वच्छतागृहामध्ये मारहाण करून त्याच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित मुलाच्या कुटुंबियांकडून याबाबत दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये तकार दाखल केल्यानंतर आऱोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यात १६ वर्षीय मुलावर त्याच्याच तरुण मित्राने अनैसर्गिक अत्याचार केला. तळजाई पठार इथे पीडित अल्पवयीन मुलगा राहतो. तो दांडेकर पूल इथं राहणाऱ्या सागर सोनवणे या २१ वर्षीय तरुणाच्या घरी आला होता. त्यावेळी ओळखीचा फायदा घेत सागरने पीडित मुलाला स्वच्छतागृहात नेऊन मारहाण केली. त्यानंत तिथेच अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आले. दत्तवाडी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचार कऱणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: पोलिसांच्या हातावर चोरट्यांची तुरी

१६ वर्षीय पीडित मुलाने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आता तरुणाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, पीडित मुलावर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

loading image
go to top