Pune News : ‘परिवर्तना’ची पहाट; अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत होतेय घट

२०२३ मध्ये बालगुन्हेगारीत घट झाल्याचे आशादायक चित्र
minor children crime decreases police parivartan project
minor children crime decreases police parivartan projectesakal

Pune News : शहरात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत २०२३ मध्ये बालगुन्हेगारीत घट झाल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. पोलिसांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने झोपडपट्टी परिसर, वस्त्यांमध्ये ‘परिवर्तन’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. या प्रयत्नांमुळे आगामी वर्षात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.

शहरात कोठे वाहनांची तोडफोड झाली, एखाद्या गुंड टोळक्याने तलवार, कोयत्याने हल्ला केला की त्या गुन्ह्यात एखाद्या अल्पवयीन मुलाचा सहभाग असेल हे ठरलेले समीकरण. परंतु अशा घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग का वाढत आहे, याची कारणे पुणे पोलिसांनी शोधली.

बेरोजगारी, वाईट मुलांची संगत, घरातील आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह आणि शिक्षणाचा अभाव अशी काही प्रमुख कारणे आढळून आली आहेत. झोपडपट्टीदादा आणि सराईत गुन्हेगार गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा आधार घेतात.

त्यांना पैशांचे आमिष दाखवून गुन्हेगारीत ओढले जाते, हे आणखी एक कारण. पोलिसांनी या प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन तो सोडविण्याचा निर्णय घेतला.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. झोपडपट्टी परिसर आणि वस्त्यांमध्ये ‘परिवर्तन’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. सध्या शहरातील विविध भागातील झोपडपट्ट्या, वस्त्यांमधून ‘परिवर्तन’ प्रकल्प राबविला जात आहे. ‘शीतल अस्तित्व’ आणि ‘मनोदय’ अशा काही सामाजिक संस्था यासाठी काम करीत आहेत.

‘परिवर्तन’ प्रकल्पात नेमके काय?

- १४ ते १७ वयोगटांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे

- मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे

- वयोगटानुसार स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण

- गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांचे समुपदेशन

- क्रीडा, शिक्षणाच्या आवडीनुसार आर्थिक मदत

- समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न

‘भरोसा सेल’चे बालसुरक्षा पथक, ‘पोलिस काका’ आणि ‘पोलिस दीदी’ यांच्याकडून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जात आहे. वंचित गरीब मुलांच्या पुनर्वसनासाठी पोलिस ठाण्यांमध्ये ‘बालस्नेही’ कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

‘परिवर्तन’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलिस, शिक्षक, डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून सुमारे पाच हजार मुलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. मुलांची मानसिकता आणि त्यांचा व्यवसायातील कल बघून कौशल्य विकास उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांचे सहकार्य घेतले जात आहे. पालकांनी मुलांच्या अडचणी जाणून त्यांच्याशी संवाद वाढवणे गरजेचे आहे.

- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

वर्ष अल्पवयीन मुलांनी केलेले गुन्हे विधीसंघर्षग्रस्त मुले

२०२१ - ३५७ -५५६

२०२२ -३०८ -५०७

२०२३- २५५ -३८८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com