esakal | फॅमिली कोर्टमधील तत्काळ दाव्यांच्या सुनावणीला मिळणार गती; इतर प्रकरणांना 'तारीख पे तारीख'!
sakal

बोलून बातमी शोधा

Court

सध्या न्यायालयाचे कामकाज एकाच शिफ्टमध्ये सकाळी 11 ते 2 यावेळेत सुरू आहे. त्यात आता आणखी दोन तास वाढविण्यात आले आहेत. या वेळेत प्रामुख्याने मुलांचा ताबा, पोटगी आणि परस्पर संमतीने दाखल होणाऱ्या प्रकरणांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

फॅमिली कोर्टमधील तत्काळ दाव्यांच्या सुनावणीला मिळणार गती; इतर प्रकरणांना 'तारीख पे तारीख'!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणांना गती मिळावी म्हणून कामकाजाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. दोन नोव्हेंबरपासून सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत न्यायालय खुले राहणार आहे. त्यात केवळ तत्काळ प्रकरणांची सुनावणी होईल. त्यामुळे ते दावे लवकर निकाली निघू शकतात. मात्र, इतर प्रकरणांना तारीख पे तारीख मिळणार आहे.

'ईद-ए-मिलाद'ला मिळाली सामाजिक बांधिलकीची जोड!​

सध्या न्यायालयाचे कामकाज एकाच शिफ्टमध्ये सकाळी 11 ते 2 यावेळेत सुरू आहे. त्यात आता आणखी दोन तास वाढविण्यात आले आहेत. या वेळेत प्रामुख्याने मुलांचा ताबा, पोटगी आणि परस्पर संमतीने दाखल होणाऱ्या प्रकरणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या पक्षकारांची आणि वकिलांची तारीख आहे त्यांनाच प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. तर इतर महत्त्वाच्या कामासाठी वकिलांना न्यायालयात यायचे असेल, तर त्यांना न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागेल. सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगचा वापर अधिक करण्यात यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी आणि बार रुमचे सॅनिटायझेशन करण्यावर वकिलांच्या संघटनेने लक्ष ठेवावे, असे रजिस्टार जनरल एस. जी. दिघे यांनी जारी केलेल्या एसओपीमध्ये नमूद केले आहे.

Breaking news : पुण्यात होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण केंद्र

या प्रकरणांवर होणार प्राधान्याने सुनावणी :
- वेळमर्यादा निश्‍चित करण्यात आलेले दावे
- अंशतः सुनावणी झालेले प्रकरण
- पोटगीचा अर्ज
- पोटगीची रक्कम काढण्याची विनंती
- मुलांचा ताबा मिळण्यासाठी केलेला अर्ज

कामकाजाची प्रक्रिया :
- तारीख असलेल्या पक्षकार आणि वकिलांनाच न्यायालयात प्रवेश
- दाव्यांचा बोर्ड दोन दिवस आधी वकिलांना मिळणार
- तातडीच्या कामानिमित्त न्यायालयात येण्यासाठी परवानगी घ्यावी
- सुनावणी असलेल्या वकिलांनाच बार रुमचा वापर करता येणार
- लहान मुलांना भेटण्यासाठी असलेली रूम बंद राहणार
- सर्व नियमांचे पालन करून मिडीएशन रुमचा वापर

पुण्यात २०७ टक्के जास्त पाऊस; मुंबईखालोखाल परतीचा पाऊस पुणे जिल्ह्यात बरसला​

असे असणार वेळेचे नियोजन :
- न्यायालयाची एकूण वेळ - 10.30 ते 04.00
- न्यायिक कामकाज - 11.00 ते 03.30
- युक्तिवाद आणि घटस्फोटाचे दावे - 11.00 ते 12.30
- पुराव्यांची नोंदणी आणि युक्तिवाद - 12.30 ते 02.00
- युक्तिवाद आणि साक्षीपुरावे - 02.30 ते 03.30
- जेवणाची सुटी - 02.00 ते 02.30

गेले सात महिने साक्ष पुरावा नोंदविण्याचे काम बंद होते, आता मात्र ते सुरू होणार असल्यामुळे वैवाहिक खटल्यातील पक्षकारांना दिलासा मिळणार आहे. कोरोना विषयक सर्व खबरदारी घेऊन पक्षकार व वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी व्हावी.
- सुभाष काफरे, कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image