esakal | ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

Dr_Shakarrao_Gowarikar

डॉ. गोवारीकर यांनी पदार्थविज्ञान आणि इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग विषयातील पदवी आणि आण्विक भौतिकशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. घेतलेली होती.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर (वय 89) यांचे गुरुवारी (ता.29) मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी वासंती, विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. 

डॉ. गोवारीकर यांनी पदार्थविज्ञान आणि इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग विषयातील पदवी आणि आण्विक भौतिकशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. घेतलेली होती. 1955 मध्ये त्यांनी त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातील कार्यास प्रारंभ केला. ट्रॉम्बे येथील ऍटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट येथे ते संशोधन करीत होते. त्यानंतर इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे तीन वर्षे संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर पुन्हा ते ऍटोमिक एनर्जी विभागात रुजू झाले. स्वदेशी वैज्ञानिक उपकरणे आणि यंत्रणा विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

Breaking news : पुण्यात होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण केंद्र

डॉ. गोवारीकरांचा प्रवास :
- भारताचा पहिला इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर विकसित केला. 
- 1983मध्ये चंडीगड येथील सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट्‌स ऑर्गनायझेशनच्या (सीएसआयओ) संचालक 
- 1991मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू 
- तेव्हाच्या पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज इन इन्स्ट्रूमेंटेशनचे अध्यक्ष 
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संस्थेचे सदस्य होते. 
- याच काळात भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे सदस्य आणि मुक्तांगण विज्ञानशोधिकेचे कार्यकारी अध्यक्ष 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image