
आंभू या छोट्याशा डोंगरी भागातील गावात रामदास आतकर यांचे कुटुंब आहे. ते कामानिमित्त बाहेरगावी राहतात. पण त्यांचे वयस्कर आईवडील आणि त्यांची १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी पूजा, गावातच राहतात. पूर्वी त्यांची बहीण व भाचा तुषार क्षीरसागर त्यांच्याकडेच राहत होते. पुढे कामाच्या निमित्ताने बहीण आणि भाचा पुण्यात राहावयास गेले.
राजगुरुनगर(पुणे) : खेड तालुक्यातील आंभू या गावी, शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र टोळक्याने, फिल्मी स्टाईल दहशत माजवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. प्रेमप्रकरणातून तरुणाबरोबर पळून गेलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी सूडाच्या उद्देशाने, मुलाची मामेबहीण पळवून नेऊन पकडून ठेवले. ''आमची मुलगी घरी आणून द्या आणि मग, या मुलीला घेऊन जा'' असा फिल्मीस्टाईल पवित्रा त्यांनी घेतल, पण तो त्यांना चांगलाच महागात पडला. खेड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आणि मुलगीही सोडवून आणली.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आंभू या छोट्याशा डोंगरी भागातील गावात रामदास आतकर यांचे कुटुंब आहे. ते कामानिमित्त बाहेरगावी राहतात. पण त्यांचे वयस्कर आईवडील आणि त्यांची १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी पूजा गावातच राहतात. पूर्वी त्यांची बहीण व भाचा तुषार क्षीरसागर त्यांच्याकडेच राहत होते. पुढे कामाच्या निमित्ताने बहीण आणि भाचा पुण्यात राहावयास गेले. तेथे कोथरूड परिसरातील एका मुलीशी भाचा तुषार याचे प्रेमप्रकरण जुळले. काही दिवसांपूर्वी तो त्या मुलीसह पळून गेला. त्यामुळे मुलीचे कुटुंबीय व नातेवाईक चिडले. ते त्यांना शोधायला आंभू येथे येत होते.
शुक्रवारी मध्यरात्री मुलीची आई, राणी भेलके आणि पुण्यातील काही तरुण तलवार आणि अन्य हत्यारे घेऊन आतकर यांच्या घरी मोटारीतून आले. तेथे त्यांनी तलवारीच्या धाकाने ''तुषार क्षीरसागर कुठे आहे सांगा? नाहीतर तुम्हाला ठार मारतो,'' अशी धमकी दिली. राणी भेलकेने आजी-आजोबांच्या समक्ष नात पूजाचे केस धरून तिला फरफटत बाहेर नेले. बाहेर उभ्या असलेल्या मोटारीत बळजबरीने पूजाला बसविले आणि तिला घेऊन गेले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या घटनेमुळे भांबावलेले आतकर कुटुंबीय पहाटेच खेड पोलीस ठाण्यात गेले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर शेखर भोईर, स्वप्नील गाढवे, अमोल चासकर, प्रवीण गेंगजे, निखिल गिरीगोसावी, बाळकृष्ण साबळे या खेड पोलिसांच्या पथकाने पुण्याला जाऊन अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तसेच अपहरण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेल्या दोघांना अटक केली.