अल्पवयीन मुलीचे अपहरण, विनयभंग आणि...

Minor Girl was kidnapped molested and thrown out from Auto Rickshaw in After
Minor Girl was kidnapped molested and thrown out from Auto Rickshaw in After

पिंपरी : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रिक्षातून पळवून नेले. तिचा विनयभंग करून  रिक्षातून बाहेर ढकलून दिले. हा प्रकार निगडी येथे घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कैलास विटकर ( वय 32), राहुल धोत्रे (वय 32), अजय शिंदे ( वय 32, सर्व रा. आम्रपाली हाऊसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी  ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पुणे : डीएसकेंची आणखी एक आलिशान कार पोलिसांनी केली जप्त!
 

शनिवारी (ता. 29) सकाळी पीडित मुलगी दुकानात प्रोजेक्ट पेपर आणायला जात होती. त्यावेळी  रिक्षातून आलेल्या आरोपींनी ओटास्कीम येथील मुले/ मुली शाळा क्रमांक 2/2 येथून मुलीला जबरदस्तीने रिक्षात बसविले. विटकर व धोत्रे याने मुलीचे तोंड दाबून 'तुझ्या आईला कस मारतो बघ' अशी धमकी देत मारहाण केली. तसेच दोघांनी तिच्याशी अश्लील वर्तन केले. यानंतर यमुनानगर येथील पवळे क्रीडांगण येथे तिला रिक्षातून ढकलून दिले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com