pournima bhosekar
sakal
- गणेश सुळ
कानगाव - पाटस रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आज सकाळी घडलेल्या एका थरारक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कानगाव बाजू कडून पाटस रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत असताना उभी असलेली मालगाडी अचानक सुरू झाल्याने एका महिलेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी थेट मालगाडीखाली झोपावे लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.