राज्यभरातील मिसळींची चव चाखण्याची संधी : पुणेकरांसाठी ‘सकाळ’च्यावतीने तीन दिवसीय मिसळ उत्सवाचे आयोजन

खवय्ये पुणेकरांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या मिसळींची चव चाखता यावी यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे तीन दिवसांचा ‘मिसळ उत्सव’ २६ ते २८ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
Misal utsav
Misal utsav sakal

Pune News : खवय्ये पुणेकरांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या मिसळींची चव चाखता यावी यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे तीन दिवसांचा ‘मिसळ उत्सव’ २६ ते २८ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. पुण्यासह राज्यात प्रसिद्ध असलेल्या विविध प्रकारच्या मिसळींवर पुणेकरांना यथेच्छ ताव मारता येणार आहे.

म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रस्त्यावरील बोगनवेल फार्ममध्ये २६ ते २८ एप्रिलदरम्यान हा उत्सव होणार आहे. मिसळ हा महाराष्ट्राचा खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. मिसळबाबतीत खवय्यांच्या मनात एक रस्सेदार भाव आणि प्रेम आहे. खवय्यांची भूक छोटी असो वा मोठी, अनेकदा ही मिसळच त्यांच्या मदतीला धावून येते.

मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे भुकेच्या वेळी अस्सल खवय्यांना मिसळ आठवतेच, त्याशिवाय मित्रमंडळींना एकत्र जमविण्यासाठीही मिसळ हेच निमित्त असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मिसळची चव आणि ती बनविण्याची पद्धत दर ४० मैलांवर बदलत जाते. अनेकजण त्यात विविध प्रकारचे पाककृती प्रयोग करून त्याची लज्जत वाढवितात. अशा विविध प्रकारच्या मिसळ यानिमित्ताने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. पुण्याची चवदार मिसळ, मुंबईची ठसकेबाज मिसळ, कोल्हापूरची झणझणीत तर्री असलेली मिसळ, नगर येथील गावरान मिसळीचा ठसका या सगळ्या मिसळीच्या प्रकारांची चव येथे चाखता येणार आहे.

स्थळ आरक्षणाची सुवर्णसंधी

‘सकाळ’च्यावतीने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खवय्ये पुणेकर मोठ्या प्रमाणात या उत्सवास भेट देणार आहेत. त्यामुळे उत्सवात व्यवसायाची मोठी संधी आहे. या संधीचा हॉटेल चालकांना फायदा घेता येणार आहे.

‘मिसळ उत्सवा’विषयी...

कधी : २६, २७ आणि २८ एप्रिल

कुठे : बोगनवेल फार्म, डी. पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ, पुणे

केव्हा : सकाळी १० ते रात्री १०

सुविधा : पार्किंग मोफत

संपर्क : ७९७२३६७७९६, ७७२२००१०९७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com