#MissionAdmission अकरावीसाठी ७६ हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या शाखांसाठी असलेल्या एकूण ९६ हजार ३२० जागांसाठी सुमारे ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. विज्ञान शाखेच्या ३९ हजार ९० जागा असून त्यासाठी ३२ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील २८५ कनिष्ठ महाविद्यालयांतील जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकरावीसाठी ४० हजार ८६३ मुलांनी, तर ३५ हजार ७६ मुलींनी ऑनलाइन अर्ज केला आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी येत्या शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजता जाहीर  होईल. या यादीवर ३० जून ते २ जुलै दरम्यान हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर ३ जुलै रोजी हरकतींचे निवारण केले जाईल. पहिली  नियमित गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी जाहीर होईल, अशी माहिती समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली.

Web Title: #MissionAdmission 76 thousand applications for FYJC