‘टीईटी’ प्रश्‍नपत्रिकेतील चुकांसाठी मोजकेच गुण

‘टीईटी’ प्रश्‍नपत्रिकेतील चुकांसाठी मोजकेच गुण

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्‍नपत्रिकेत असंख्य चुका झालेल्या असल्या, तरी उमेदवारांना त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर सरासरी पाच ते सात गुण मिळणार आहेत. उमेदवारांना सरसकट गुण मिळणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

शिक्षण म्हणून नोकरी लागण्यासाठी ‘टीईटी’ पात्र असणे अनिवार्य आहे. राज्यात तब्बल दीड वर्षानंतर १९ जानेवारीला ‘टीईटी’ परीक्षा झाली. त्यासाठी लाखो शिक्षकांनी अर्ज केले होते. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत ही परीक्षा झाली होती. या परीक्षेत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या 

मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे समोर आले. एका वाक्‍यात किमान चार ते पाच शब्द अशुद्ध होते. त्यामुळे काही प्रश्‍नांचे अर्थही लवकर समजत नव्हते. यावरून परीक्षा परिषदेच्या कारभारावर टीका झाली होती. प्रश्‍नपत्रिकेतील अशुद्ध लेखनाचा प्रकार समोर आल्यानंतर याप्रकरणी तपासणीसाठी परीक्षा परिषदेने तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीने नुकताच अहवाल सादर केला. प्रत्येक प्रश्‍नात अशुद्ध शब्द असले, तरी त्यांचा अर्थ बदलत नाही. त्यामुळे प्रश्‍न समजून भावी शिक्षकांना उत्तर लिहिणे शक्‍य होते. त्यामुळे त्यांना अशा प्रश्‍नांचे गुण मिळणार नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.

चुका करणाऱ्या संस्थेला दंड करणार
‘‘प्रश्‍नपत्रिकेतील अशुद्ध लेखनाचा अहवाल मिळाला आहे. अशुद्ध लेखनामुळे अर्थ बदलला नाही अशा प्रश्‍नांचे गुण दिले जाणार नाहीत. समजत नव्हते, अशा पाच ते सात प्रश्‍नांचे गुण दिले जातील. हे गुण सरसकट मिळणार नसून, उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या सरासरीवरून दिले जाणार आहेत. प्रश्‍नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या चुका असल्याने याबाबत संबंधित संस्थेला नोटीस बजावली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’’ असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com