
पुणे : लॉकडउनच्या काळात व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरव्दारे आक्षेपार्ह व्हिडिओ, खोटी माहिती व बदनामीकारक मजकूर आणि कोरोनाविषयी खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध राज्यात तब्बल 400 गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी सव्वादोनशे जणांना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनामुळे राज्यात 22 मार्चपासून संचार मनाई आदेश लागू करण्यात आले होते. कोरोना विषाणुचा संसर्ग हा नागरीकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्यामुळे त्याबाबत कोणत्याही प्रकारची चुकीची व खोटी माहिती, व्हिडिओ प्रसारीत करणे हा सायबर कायद्यानुसार गुन्हा ठरतो. असे असूनही
अनेकजण अशी व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरव्दारे आक्षेपार्ह, खोटी माहिती व बदनामीकारक मजकूर प्रसारित करत असल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून राज्यातील सर्व शहरे व जिल्हा पोलिसांशी संपर्क साधून अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार 22 मार्च ते 17 मे 2020 या कालावधीत तब्बल 400 जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 17 गुन्हे हे अदखलपात्र आहेत. या गुन्हेमध्ये पोलिसांनी 211 आरोपीना अटक केली आहे.
आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड करण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यादृष्टीने पोलिसांनी आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या 169 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट पुढे पाठवल्या प्रकरणी 154 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हे दाखल होण्याची कारणे व गुन्हे संख्या
-आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड करणे - 169
-आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर करणे - 154
- टिकटॉक, व्हिडिओ शेअर करणे - 18
- ट्विटरवर आक्षेपार्ह ट्वीट करणे - 7
- इंस्टाग्रामवरुन चुकीच्या पोस्ट टाकणे - 4
-अन्य सोशल मिडीयाचा गैरवापर(व्हिडिओ, युट्यूब) - 43
सोशल मिडीयावरुन काढलेल्या आक्षेपार्ह पोस्ट - 102
राज्यातील एका जिल्हामध्ये एकाने कोरोना महामारीका धार्मिकतेचा रंग देणारा टिकटॉक व्हिडीओ बनवुन संबंधित व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली असती. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यास अटक केली.
"लॉकडाऊनच्या काळात काही गुन्हेगार, समाजकंटक यांच्याकडुन सोशल मिडीयाद्वारे गैरप्रकार केले जात होते. त्यांच्याविरुद्ध सर्व पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या समन्वयातुन महाराष्ट्र सायबर पोलिसाकडुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 211 जणांना अटक करण्यात आली आहे."- बालासिंग राजपूत, पोलिस अधिक्षक, महाराष्ट्र सायबर पोलिस विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.