सहलीच्या पैशांसाठी MIT ने अडवला मुलांचा निकाल; पालक-संस्थेत वाद

परदेशात कामाचा अनुभव मिळण्यासाठी एमआयटीने बी.टेक.च्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षी परदेशात नेण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी प्रत्येक वर्षाला ५० हजार रुपये भरण्यास सांगितले.
mit world peace university Pune
mit world peace university PuneSakal

पुणे - कोरोनामुळे (Corona) परदेशात सहल (Foreign Trip) जाऊ शकत नसल्याने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने (MIT World Peace University) बी. टेक. (B.Tech) च्या शेवटच्या वर्षातील सहल रद्द करावी, यासाठी भरलेले पैसे (Money) शुल्कात (Fee) वळते करावेत अशी मागणी पालकांनी (Parent) केली आहे. पण ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांचा अकराव्या सत्राचा निकाल (Result) संस्थेने अडवून ठेवला आहे. जेव्हा स्थिती सामान्य होईल तेव्हा मुलांना सहलीला नेले जाईल आता शुल्क भरावे लागेल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. (MIT Blocks Students Results for Travel Money Disputes Parent Organization)

परदेशात कामाचा अनुभव मिळण्यासाठी एमआयटीने बी.टेक.च्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षी परदेशात नेण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी प्रत्येक वर्षाला ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. तीन वर्षांचे सहलीचे दीड लाख रुपये पालकांनी भरले. कोरोनामुळे ती जाऊ शकलेली नाही. यामुळे चौथ्या वर्षाचे शुल्क या सहलीच्या पैशातून वळते करून घेण्याची मागणी सुरू आहे. सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी चौथ्या वर्षाचे शुल्क न भरल्‍याने अकराव्या सत्राचा निकाल जाहीर केलेला नाही.

mit world peace university Pune
पुणे महापालिकेच्या आधीच खासगी रुग्णालयांना मिळणार लस?

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परदेशात नेता आले नाही. जेव्हा स्थिती सुधारेल तेव्हा त्यांना परदेशात नेऊ. तेव्हा हे विद्यार्थी कोठे बाहेर नोकरी करत असतील तरीही त्यांना परदेशातील कंपनीत ट्रेनिंग दिले जाईल. अनेक विद्यार्थ्यांनी पूर्ण शुल्क भरलेले आहे, ज्यांनी शुल्क भरलेले नाही त्यांचा निकाल राखून ठेवावा लागला आहे.

- राहुल कराड, कार्याध्यक्ष, एमआयटी

आम्ही सहलीसाठी तयार होतो, पण कोरोनाच्या या काळात परदेशात सहल जाऊ शकत नाही. त्यामुळे हे सहलीचे पैसे परत न करता चौथ्या वर्षाच्या शुल्कात ॲडजेस्ट करावेत, अशी मागणी संस्थेकडे केली आहे. पण त्यांनी आमचे म्हणणे मान्य न करता पैसे न भरणाऱ्यांचा निकाल अडवला आहे.

- मोहन चौधरी, पालक प्रतिनिधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com