एमआयटीने जाचक नियमांची विद्यार्थी डायरी घेतली मागे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे : पुण्यातील माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक अटी लागु केल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासुन पालकांनी केलेल्या निषेधानंतर आज (ता. 5) एमआयटी विश्वशांती स्कुलने जाचक नियम असलेली विद्यार्थी डायरी मागे घेतली आहे. यापूढे डायरी बनवताना शिक्षण विभागाशी चर्चा करणार असल्याची माहीती एमआयटी प्रशासकीय विभागाने दिली आहे. 

पुण्यातल्या माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक अटी लागु केल्या होत्या. शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या व स्कीन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबी एवढीचं हवी, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करू नये. अशाप्रकारचे नियमांचा यामध्ये त्यांनी या डायरी मध्ये समावेश केला होता. या अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचेही या नियमांमध्ये नमूद करण्यात आले होते.

यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे मागणी रद्द करण्यासाठी पालकांनी धरणे धरले. एमआयटीच्या गेटवर आज (ता. 5) पालकांनी आणि विविध संघटनांनी एमआयटी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.  त्यानंतर अधिकृत पत्राद्वारे हा निर्णय मागे घेण्यात आला. जाचक नियम अटी असलेली विद्यार्थी डायरी रद्द केली आहे. 

Web Title: MIT has taken back the student diary