शिरूरचे आमदार म्हणतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगू आणि...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदती मिळवुन देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अशोक पवार.

उरुळी कांचन : शिंदवने, कोलवडी, सोरतापवाडीसह पुर्व हवेलीत दोन दिवसापुर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याबरोबरच, शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी शिंदवने (ता. हवेली) येथे दिली. 

काम देत का कुणी काम : ओझी उचलू, कुठेही राबू पण...

लोणी काळभोर, सोरतापवाडी, शिंदवने, कोलवडीसह पुर्व हवेलीत वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेत पिकांच्या नकसानीची पहाणी आमदार अशोक पवार यांनी शनिवारी (ता. ६) सकाळी शिंदवने येथे केली. त्यानंतर सकाळ, शी बोलतांना पवार यांनी वरील माहिती दिली.

याबाबत अधिक बोलतांना आमदार अशोक पवार म्हणाले, कोलवडी, शिंदवने, उरुळी कांचनसह कांही गावात केळीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोरतापवाडी, पेठ, नायगाव परीसरात फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, कुजींरवाडी आदी गावात भाजीपाला व उस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे महसुल खात्याने सुरु केले आहेत. मात्र पंचनामे करताना महसुल विभागाचे कर्मचारी कांही ठिकाणी दुजाभाव करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे पुर्व हवेलीमधील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतील याकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

आमदार पवार म्हणाले, ''शिंदवने गावातील अनेक शेतकऱ्यांना मागिल वर्षीच्या नुकसानीची मदत अद्याप मिळालेली नसल्याचे उघड झाले आहे. ही बाब अंत्यत गंभीर असल्याने, याबाबत हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी यांच्याशू चर्चा करुन, मागिुल वर्षीची मदत तात्काळ देण्याच्या सुचना करण्यात आली आहे. पुर्व हवेलीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर व भरीव मदत मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत.'' 

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला शाॅक; `एवढे` झाले नुकसान...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashok Pawar says let's help the farmers