आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रीपदाची लाॅटरी...

राजकुमार थोरात
Sunday, 29 December 2019

  • कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातवरण...
  • कार्यकर्त्यांची मुंबईकडे जाण्याची तयारी...

वालचंदनगर : राष्ट्रवादी कॉग्रेसचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याने इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी शपथ सोहळ्यासाठी मुंबईकडे जाण्याची जोरदार तयार केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळाचा विस्तार सोमवार (ता.३०) रोजी होत आहे. नव्याने होणाऱ्या मंत्रीमंडळामध्ये इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांची वर्णी लागल्याचे बोलले जाते. गेल्या अनेक दिवसापासून भरणे यांना मंत्रीपद देण्याची मागणी करण्यात येत आहे.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

भरणे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार असल्याने इंदापूर तालुक्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यामध्ये आनंदी-आनंद झाला आले. सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांनी शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईकडे जाण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे पहिला मंत्री होण्याचा बहुमान भरणे यांना मिळणार आहे. भरणे यांनी २०१४  व २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करुन आमदार होण्याचा बहुमान मिळवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Datta Bharne may Appointed as state Minister