esakal | भामा-आसखेड आंदोलनाबाबत आमदार मोहिते म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

mohite.jpg

आंदोलन कोण करतंय, त्यांच्या पाठीमागे कोण आहे. अधिकाऱ्यांनी जमीन वाटपात कोट्यवधी रुपये कमविले त्यांची चौकशी शासनाने करावी, असे आमदार दिलीप मोहिते म्हणाले.

भामा-आसखेड आंदोलनाबाबत आमदार मोहिते म्हणतात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चाकण : खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणग्रस्तांना जमिनी मिळाव्यात या मागणीसाठी आंदोलन कोण करतंय, त्यांनी शेकडो एकर जमिनी स्वतः साठी मिळविल्या. सर्वसामान्य धरणग्रस्ताला मात्र जमिनी मिळाल्या नाहीत. जे आंदोलन करण्यासाठी पुढे येतात त्यांनी मात्र जमिनी मिळविल्या. त्यामुळे आंदोलन कोण करतंय, त्यांच्या पाठीमागे कोण आहे. अधिकाऱ्यांनी जमीन वाटपात कोट्यवधी रुपये कमविले त्यांची चौकशी शासनाने करावी, असे आमदार दिलीप मोहिते म्हणाले. 

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

धरणग्रस्तांना जमिनी मिळाव्यात म्हणून आंदोलन सुरू आहे.
काही अधिकाऱ्यांमुळे जमिनीचे व्यवहार करणारे एजंट, काही आंदोलन कार्यकर्ते यांनी आंदोलन सुरू केले आहे. जे आंदोलन करत आहेत त्यांनी खेड तालुक्यात मोक्याच्या ठिकाणी जमीनी मिळविल्या, त्या करोडो रुपयांना विकल्या. करोडो रुपये कमविले, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची व अधिकाऱ्यांची मोठी साखळी आहे.

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

तसेच यांनी आंदोलनाची भिती दाखवायची, अधिकाऱ्यांनी त्यांच्याप्रमाणे वागायचे यांनी त्यांची कामे करून घ्यायची. जमिनी मिळवायच्या हे काम काही आंदोलन कार्यकर्त्यांची टोळी करत आहे. सर्वसामान्य धरणग्रस्ताला जमीन मिळाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे. जे आंदोलनाच्या नावाखाली स्वतः जमिनी मिळवितात त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी शासनाकडे तसेच मंत्र्यांकडे केली आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top