बिबवेवाडीत कोविड सेंटर सुरू करा; आमदार मिसाळ यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

MLA_Madhuri_Misal
MLA_Madhuri_Misal

पुणे : बिबवेवाडीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येथील राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) रुग्णालयात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ११० बेडचे कोविड सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

आमदार मिसाळ यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत सोमवारी (ता.१३) रुग्णालयातील सोयी-सुविधांची आणि तयारीची पाहाणी केली. तहसिलदार तृप्ती कोलते पाटील, डॉ. सुनील जगताप यावेळी उपस्थित होते.

मिसाळ म्हणाल्या, 'या रुग्णालयात ११० बेड तयार आहेत. अतिदक्षता विभागात १० बेडची व्यवस्था आहे. शस्त्रक्रियेसाठी २ आणि शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांसाठी ४ बेड उपलब्ध आहेत. अतिदक्षता विभाग, नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभाग, इंटेनसिव्ह केअर विभागासाठी एकूण ३१ बेड आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. कोविड चाचण्या, विलगीकरण कक्ष आदी सुविधा देता येतील. यासाठी मी गेले पंधरा दिवस सातत्याने पाठपुरावा करीत आहे. हे सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.'

कोविड-19 च्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, रुग्णालयाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली.

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com