पंकजा मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या खासदार काकडेंबाबत आमदार मिसाळ म्हणाल्या...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवरून पुणे शहर भाजपमध्येच खडाजंगीचा सामना रंगला

पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवरून पुणे शहर भाजपमध्येच खडाजंगीचा सामना रंगला आहे. मुंडे यांच्या पवित्र्याकडे बोट दाखवत खासदार संजय काकडे यांनी टीका करताच भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी खासदार काकडे यांना खडेबोल सुनावले. "आमच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना महत्त्व देत नाही,' असा टोला लगावत मिसाळ यांना काकडे यांना फटकारले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परळी येथे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावर आज संजय काकडे हे फडणवीस यांच्या समर्थनार्थ उतरले.

ही होती स्मीता पाटील यांची शेवटची इच्छा

'पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य भाजपच्या कार्यकर्त्यांना दुखावणारे आहे. आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडणे योग्य नाही. पाच वर्षे पंकजा मुंडे यांच्याकडे महत्वाची खाती होती. पण साधा मतदारसंघ सांभाळता आला नाही. व्यवस्थित काम केले असते तर तर विधानसभेला 1 लाख मतांनी निवडून आल्या असत्या. आता दौरे काढून काय दिवे लावणार?. पंकजा यांनी मराठा, मुस्लिम, दलित यांच्याकडे दुर्लक्ष केले. गोपीनाथ मुंडे यांची जनतेशी नाळ जोडली गेलेली होती, पण पंकजा मुंडे यांनी कोणालाही जवळ केले नाही. आता जातिवादाचे राजकारण करून काही तरी मिळावे, यासाठी पक्षाला ब्लॅकमेल करत आहेत, अशी टीकेची झोड उठवली.

चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी

काकडे यांची पत्रकार परिषद होताच मुंडे यांच्या निकटवर्तीय असलेल्या माधुरी मिसाळ यांनीही पत्रकार परिषद घेऊन काकडे यांच्यावर टीका केली. "गेल्या दोन तीन दिवसांपासून बाहेरच्या शक्ती भाजपमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत. काकडे यांनी जे विधान केले ते त्यांचे वैयक्तीक विधान आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. बाहेरच्या माणसाने भाजपच्या अंतर्गत बाबींवर बोलू नये.

फडणवीस व मुंडे यांनी पाच वर्ष एकत्र काम केले आहे, त्यामुळे पक्षात फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्यात गैर काय आहे? मी स्वत: सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करते.''असे मिसाळ सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Madhuri Misal reacted on MP Sanjay Kakade comment