'ही' होती स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा

वृत्तसंस्था
Friday, 13 December 2019

अभिनय आणि संवेदनशील पार पाडलेल्या भूमिकांमुळे स्मिता पाटील यांनी अभिनय क्षेत्रात आदर्श निर्माण केला. मात्र वयाच्य़ा 31 व्या वर्षीच त्यांनी सिनेस़ृष्टीचा आणि जगाचा निरोप घेतला. 

मुंबई : अभिनय क्षेत्रात ग्लॅमरच्या पलिकडे जाऊन आदर्श निमार्ण करणाऱ्या, सशक्त आणि अनोख्या शैलीने हिंदी अभिनय क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आज त्यांची पुण्यतिथी आहे. अभिनय आणि संवेदनशील पार पाडलेल्या भूमिकांमुळे स्मिता पाटील यांनी अभिनय क्षेत्रात आदर्श निर्माण केला. मात्र वयाच्य़ा 31 व्या वर्षीच त्यांनी सिनेस़ृष्टीचा आणि जगाचा निरोप घेतला. 

आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने त्यांच्या आठवणीत एक ट्विट केलं आहे. स्मिता यांचा ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर करताना तिने लिहिलं, 'तुम्ही हजारो वर्षे जगाल'. 

स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 ला पुण्यात झाला. वडील शिवाजीराव पाटील मंत्री होते, तर आई विद्या ताई पाटील समाजसेविका होत्या. स्मिता पाटील या वयाच्या 16 वर्षीच काम करू लागल्या. न्यूज रीडर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळीच निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याशी भेट झाली. श्याम यांनी त्यांच्या 'चरण दास चोर' या चित्रपटामध्ये छोटी भूमिका साकारण्यासाठी स्मिता यांना विचारलं. त्यावेळी अँकरिंग, अभिनयासह स्मिता चांगल्या फोटोग्राफरही झाल्या होत्या.

Image may contain: 1 person, sitting, outdoor and close-up

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह 'नमक हलाल' आणि 'शक्ती' या चित्रपटातून स्मिता यांनी काम केलं. त्यानंतर मात्र स्मिता यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत त्यांनी आर्दश निर्माण केला. साध्या भूमिकांप्रमाणे स्मिता त्यांच्या गंभीर भूमिकांसाठीही ओळखल्या जायच्या. 

Image may contain: 1 person, close-up

स्मिता यांचं फिल्मी करिअर दहा वर्षांचं होतं. मात्र, आजही स्मिता यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी नावाजलं जातं. स्मिता यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण ‘आज की आवाज’ चित्रपटातील त्यांच्या आणि अभिनेता राज बब्बर यांच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली.

Image may contain: 2 people, close-up

ही होती स्मिता यांची शेवटची इच्छा...
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी 1985 मध्ये लग्न केलं. पण, प्रतिकला जन्म दिल्यावर स्मिता यांचा मृत्यु झाला. स्मिता यांना व्हायरल इन्फेक्शन झालं आणि ते मेंदूपर्यंत पोहोचलं. दवाखान्यात भरती केल्यावर 24 तासांतच त्यांच्या अवयवांनी काम करणं सोडलं होतं. 

Image may contain: 1 person, stripes and close-up

स्मिता यांचे मेकअप आर्टीस्ट दीपक सावंत हे सांगतात, 'स्मिता म्हणायच्या मी जेव्हा मरेन, तेव्हा मला लग्न होणाऱ्या वधूप्रमाणे तयार करा'. त्यांच्या या इच्छेप्रमाणे स्मिता यांच्या शवाला वधूप्रमाणे मेकअप करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This was the last wish of actress smita patil