बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, जाळले पडळकरांचे पोस्टर 

मिलिंद संगई
Wednesday, 24 June 2020

शरद पवार यांच्याबद्दल पडळकर यांनी उच्चारलेले शब्द चुकीचे असून, त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

बारामती (पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे अपशब्द उच्चारल्याबद्दल आज बारामतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरुध्द जोरदार घोषणाबाजी केली. 

आदिवासी भागातील पूजा शिवाजी भोईर हिची झाली तहसीलदारपदी निवड    

शरद पवार यांच्याबद्दल पडळकर यांनी उच्चारलेले शब्द चुकीचे असून, त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ, तालुका युवकाध्यक्ष राहुल वाबळे, साधू बल्लाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी पडळकर यांचे पोस्टर जाळण्याचाही प्रयत्न केला गेला मात्र पोलिसांनी यात हस्तक्षेप केला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनेटायझर्सचा वापर करीत आंदोलन केले गेले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्यांना बारामतीत डिपॉझिट राखता आले नाही, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येता आले नाही, त्यांनी पवारसाहेबांसारख्या राष्ट्रीय नेत्यावर टीका करणे निषेधार्ह असल्याचे अमर धुमाळ यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Padalkar's poster burnt by NCP workers in Baramati