पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ठेकेदार, पार्किंग, सुरक्षा रक्षक, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, गाळ्यांचे वाटप, परवाना गैरव्यवहार तसेच जी-५६ या खुल्या जागांमध्ये अनियमितता करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व गैरव्यवहारात पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर केला गेला असल्याचाही आरोप पवार यांनी केला.