
भोसले यांनी 2019 मध्ये जनजागृती संघटनेला प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात त्यांनी एक लाख ठेविदारांचे 430 कोटी रूपये देण्याचे कबुल केले होते.
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले आणि सूर्याजी जाधव यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याप्रकरणी योगेश लकडे (वय-39, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँक गैरव्यवहार प्रकरणी 16 जणांवार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडूरंग जाधव , तानाजी पडवळ, शैलेश भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल भोसले आणि सूर्याजी जाधव यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
- पुण्यात दर १७ मिनिटांनी आढळतोय कोरोनाचा एक नवा रूग्ण; वाचा सविस्तर!
अनिल भोसले हे बँकेचे संचालक असतांना गैरव्यवहार झाला नाही. पोलिसांनी तपासादरम्यान सर्व कागपत्रे जमा केली आहेत. संचालक असल्याने बँकेचे दैनंदिन कामकाज ते पाहत नव्हते, त्यामुळे जामिन मंजूर करावा असा युक्तीवाद बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अनिल भोसले संचालक आतांनाच बँकेत गैरव्यवहार होण्यास सुरूवात झाली. रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले होते. त्यामुळे ठेविदारांना बँकेतून फक्त एक हजार रूपये काढण्याची मुभा होती, असे असताना भोसले यांनी बँकेतून दोन कोटी रूपये काढले. त्या रकमेचा कशाप्रकारे व्यवहार झाला त्याचा हिशोब नाही. खाते नसतांना 80 कोटी रूपयांचा धनादेश एका खात्याच्या नावावर काढण्यात आला. त्या 80 कोटींचा हिशोब नाही.
- 'आता कायमचं घरीच थांबा'; कामावरून काढल्याचा आयटी कर्मचाऱ्यांना मेसेज!
भोसले यांनी 2019 मध्ये जनजागृती संघटनेला प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात त्यांनी एक लाख ठेविदारांचे 430 कोटी रूपये देण्याचे कबुल केले होते. मात्र त्यातील एकही रूपया ठेविदारांना दिला नाही. भोसले हे सामाजिक, राजकिय दृष्ट्या भक्कम असल्याने साक्षिदारांना फिरविण्याची शक्यता आहे. आतापर्यंत गुन्ह्यातील 4 जणांनाच अटक करण्यात आली आहे.
गुन्हाचा तपास सुरू असल्याने भोसले, जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी फिर्यादी यांच्या वतीने ऍड. सागर कोठारी यांनी केली. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली.