esakal | पुण्यात दर १७ मिनिटांनी आढळतोय कोरोनाचा एक नवा रूग्ण; वाचा सविस्तर!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Patients

पुणे महसूल विभागातील कोल्हापूरसह राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये गेल्या ४८ तासात (दोन दिवस) एकही नवा रुग्ण सापडला नाही.

पुण्यात दर १७ मिनिटांनी आढळतोय कोरोनाचा एक नवा रूग्ण; वाचा सविस्तर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सरासरी दर सतरा मिनिटाला एका नव्या रुग्णांची भर पडू लागली आहे. ही सोमवारी (ता.२७) सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही स्थिती आहे. कालच्या तुलनेत नव्या रुग्णवाढीच्या सरासरी वेळेत तीन मिनिटांनी घट झाली आहे. काल सरासरी दर २० मिनिटाला एक नवा रुग्ण सापडत होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, पुणे महसूल विभागातील कोल्हापूरसह राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये गेल्या ४८ तासात (दोन दिवस) एकही नवा रुग्ण सापडला नाही. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

- तंबाखुमुळं खरच कोरोना पळून जातो? वाचा शास्त्रज्ञांचे म्हणणे

दर चोवीस तासांचे एकूण १४४० मिनिटे होतात. या मिनिटांना वाढलेल्या एकूण रुग्ण संख्येने भागले असता हा रुग्ण वाढीचा सरासरी कालावधी निश्चित होत असतो. त्यामुळे दररोजच्या रुग्णांच्या संख्येनुसार हा सरासरी कालावधी बदलत असतो, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.  

पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.२६) सायंकाळी सात वाजेपर्यंत म्हणजेच मागील २४ तासात ७२, तर सोमवारी (ता.२७) सायंकाळी सात वाजेपर्यंत ८४ नवे रुग्ण सापडले आहेत.

- Big Breaking : पुण्यात 71 हजार कुटुंबांचे होणार स्थलांतर; कोरोनाला रोखण्यासाठी नवी 'आयडिया'

मागील दोन दिवसांपासून एकही नवा रुग्ण न सापडलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी (दोन्ही कोंकण विभाग), जालना, लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड, नांदेड (सर्व मराठवाडा) आणि बुलडाणा, वाशिम, गोंदिया आणि चंद्रपूर (सर्व विदर्भ) आदींचा समावेश आहे.

- बापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...!

loading image
go to top