Kasaba Bypoll Election : पोटनिवडणूकीसाठी मनसे देखील इच्छुक? ३ फेब्रुवारीला जाहीर करणार भूमिका

महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी निवडणूक लढण्याची इच्छा
Raj Thackrey
Raj Thackrey Esakal

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे. अशातच महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तर अशातच पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी शिवसेना पाठोपाठ आता मनसे देखील इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कसबा पेठेत आणि परिसरातील असणाऱ्या मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. कसबा पेठ मनसे लढवू शकते असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Raj Thackrey
Kasaba Bypoll Election : शिवसैनिकांच्या भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी; कसब्यात उतरवणार उमेदवार?

तर या पोटनिवडणुकीसाठीच्या इच्छुकांची नावे अणि पदाधिकारी यांची भूमिका मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या मार्फत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर मांडली जाणार आहे. यानंतर पक्ष प्रमुख राज ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी मनसे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसून तयारी सुरू केली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आधीपासून उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. तर, दुसरीकडे आता कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांची नावे उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आली आहेत. तर उमेदवारासंबधीचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत.

Raj Thackrey
Kasaba Bypoll Election : "शिवसैनिकांच्या भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी नाही" उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार

कसबा पोटनिवडणूक लढवण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोट निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची काल पुण्यात बैठक पार पडली.

तर भाजपकडून सध्या पोटनिवडणूकीसाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी देखील घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शैलेश टिळक राजकारणात फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळकची सध्या चर्चा रंगली आहे.

Raj Thackrey
Kasaba Bypoll Election : "शिवसैनिकांच्या भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी नाही" उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com