esakal | ''हे सरकार झोपले आहे का?'' अमित ठाकरेेंनी घेतली स्वप्निलच्या कुटुबियांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

''हे सरकार झोपले आहे का?'' अमित ठाकरेंनी घेतली स्वप्निलच्या कुटुंबियांची भेट

''हे सरकार झोपले आहे का?'' अमित ठाकरेंनी घेतली स्वप्निलच्या कुटुंबियांची भेट

sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे : ''महाराष्ट्र सरकारमधील 2 लाख पद रिक्त आहे हे सरकार झोपले आहे का? असं काही पाऊल उचलल्यानंतर सरकार जागे होणार आहे का? असा सवाल करीत सरकारवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. ‘एमपीएसीसी’ची परिक्षा देऊनही हातात नोकरी नाही, आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आपण कुटुंबीयांना मदत करू शकत नसल्यामुळे स्वप्निल लोणकरने बुधवारी त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली. दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्निलच्या कुटूंबियांची आज भेट घेत आर्थिक मदत केली. ठाण्याचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावतीनं 2 लाखांचा चेक मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला दिलाय त्याच बरोबर पक्ष नेहमी पाठशी राहील असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.

हेही वाचा: ग्राहकांना फोन करणं पडणार महागात; प्रत्येक कॉलसाठी 10 हजार दंड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळे एका २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्निल सुनील लोणकर या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निल याच्या आत्महत्येने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

हेही वाचा: विधानभवनाबाहेर राडा; भाजप नेत्यांकडून माईक, स्पिकर काढून घेतला...

'आशा भेटी देऊन आमचा प्रश्न सुटणार नाहीये. आयुष्यभर आम्हाला रडतखडत जगावं लागेल. आम्हाला भेटण्यापेक्ष भरती करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी द्या. आम्हाला आमचा मुलाला नोकरीला लागली असं वाटेल. आमच्या मुलांचं बलिदान गेलंय, त्यामुळे जाग तरी आली' अशी प्रतिक्रिया स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांनी दिली.

''दरवर्षी भरती निघते, जागा असते म्हणून निघते ना? फक्त पैसे गोळा करण्यासाठी करतात का? आता जर स्वप्नीलला न्याय द्यायचा असेल तर भरती करा. अनेक स्वप्नील सरकारने वाचवले तर बरं आहे नाही भरती झाली तर असे अनेक स्वप्नील जातील" अशी प्रतिक्रिया स्वप्नीलची आई छाया लोणकर यांनी यावेळी बोलताना दिली.

loading image