सारसबाग परिसरातील 'त्या' व्हिडिओ प्रकरणी मनसेचे स्वारगेट पोलिसांकडे तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
सारसबाग परिसरातील 'त्या' व्हिडिओ प्रकरणी मनसेचे स्वारगेट पोलिसांकडे तक्रार

सारसबाग परिसरातील 'त्या' व्हिडिओ प्रकरणी मनसेचे स्वारगेट पोलिसांकडे तक्रार

पुणे - सारबाग येथे काही मुस्लिम युवक नमाज पठण करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेतली आहे. मनसेने याबाबत स्वारगेट पोलिसांकडे तक्रार केली असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा शेडगे, आशिष देवधर, निलेश हांडे, आशिष साबळे, विक्रांत आमराळे, गणेश भोकरे यांच्या शिष्टमंडळाने स्वारगेट पोलिसांकडे आपल्या मागणीचे पत्र व तक्रार अर्ज दिला. सारसबाग येथून दोनशे मीटर अंतरावर आदमबाग मशीद आहे, तसेच पर्वती पायथा, दत्तवाडी येथेही धार्मिक स्थळे आहेत. तेथे जाऊन नमाजपठण करावेत, प्रशासनानेही या व्हिडिओची तपासणी करावी, संबंधित तरुणावर योग्य कारवाई करावी, तसेच भविष्यात त्या परिसरात धार्मिक प्रार्थना करण्यात येऊ नये, अशा सूचनाही द्याव्यात, अशी मागणी मनसेने आपल्या पत्रात केली आहे.

Web Title: Mns Complaint With Swargate Police In That Video Case In Sarasbagh Area Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top