Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना मनसेचं चॅलेंज

विनायक बेदरकर
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्याविरोधात विरोधकांचा सर्वमान्य एक उमेदवार असावा यासाठी मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे.

कोथरूड (पुणे) : कोथरूड मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांच्यावतीने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 

Vidhan Sabha 2019 : टिळेकर, मोरे, बागवे, कांबळे, मिसाळ यांच्या रॅली

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्याविरोधात विरोधकांचा सर्वमान्य एक उमेदवार असावा यासाठी मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. अद्यापपर्यंत राष्ट्रवादीने कोथरूड मतदारसंघात उमेदवार दिला नाही. त्यामुळे किशोर शिंदे हेच विरोधकांचे सर्वमान्य उमेदवार ठरणार आहेत. 

Vidhan Sabha 2019 : शिरोळे, बहिरट यांचे अर्ज दाखल

आज सकाळी दहा वाजता मनसे उमेदवार किशोर शिंदे शास्त्रीनगर येथील संगम चौक येथून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader Kishor Shinde fight against Chandrakant patil in Kothrud for Maharashtra Vidhansabha 2019