मनसेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी संतोष भिसे यांची निवड

राजकुमार थोरात
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर)  येथील संतोष भिसे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात झाली.

वालचंदनगर मधील संतोष भिसे गेल्या अनेक वर्षांपासून मनसेच्या वालचंदनगर शहर अध्यक्षपदी काम करीत होते. भिसे यांनी पक्षाच्या माध्यमातुन सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तसेच रस्ते, वीज, पाणी या विषयावरती अनेक आंदोलने करून जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. याची पक्षाने दखल घेऊन पक्षाच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी तालुकाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिले.

राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीनंतर  भिसे यांनी सांगितले, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातुन सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार अाहेत. तसेच इंदापूर तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी जिल्हाचे उपाध्यक्ष पोपट सूर्यवंशी, निलेश वाबळे, तालुका उपाध्यक्ष प्रदीप रकटे, सुनील मोरे, प्रशांत पवार, राजू कांबळे आदी उपस्थित होते.
 
Web Title: MNS leader santosh bhise is apointed as incharge of indapur