
राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच पुण्यात शिवसेनेची खेळी, घडामोडींना वेग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण गरम केलं आहे. राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि अयोध्येचा दौरा चर्चिला जातोय. अयोध्येचा दौरा सध्या स्थगित करण्यात आला आहे. मात्र त्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. आधी नदी पात्रात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पावसाच्या कारणास्तव सभा गणेश कला क्रीडा मंचच्या सभागृहात होणार आहे. (Raj Thackeray News)
दरम्यान, याआधीच मनसेला गळती लागायला सुरुवात झाली आहे. त्यातच शिवसेनेने संधी साधत मनसेचे बडे नेते फोडल्याने सभेआधीच पुण्यात घामोडींना वेग आलाय. (Raj Thackeray Pune Rally)
सध्या ठाकरेंच्या सभेची मनसेकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. त्यातच सेनेने मोठा धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. कारण राज ठाकरे यांच्या सभेदिवशीच मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Raj Thackeray Marathi News)
हेही वाचा: राज ठाकरे पुण्यातून निघताच कार्यकर्त्यांमध्ये राडा, नेते आले हमरी-तुमरीवर
उद्याच मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत सेनेच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यातून राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला मोठा धक्का देण्याची खेळी शिवसेनेनी खेळल्याचं कळतंय.
याआधीही पुण्यातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. यानंतर २१ तारखेला सभा होणार असल्याचं जाहीर झालं. त्यानंतर पुन्हा ही सभा गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी २२ तारखेला सकाळी दहा वाजता होणार असल्याचं स्पष्ट झालं. या सभेचा टिझरही रिलीज करण्यात आला आहे.
यापूर्वी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून बाजूला करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या काही कार्यक्रमांना ते अनुपस्थित अल्याचंही स्पष्ट दिसलं. यातच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे पुण्याची व्यवस्था लावण्यासाठी आले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी पु्न्हा मुंबईकडे कूच केलं. यानंतर पुण्यातील मनसे कार्यालयात पदाधिकारी हमरीतुमरीवर आले होते.
शिवाजीनगरचे विभागअध्यक्ष रणजीत शिऱोळे यांनी बैठकांना बोलवत नसल्याची तक्रार केली होती. त्या नाराजीतून मनसेचे पदाधिकरी एकमेकांना भिडले. आता पुन्हा काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याचं समोर आलंय. त्यामुळे ठाकरे यांच्या सभेच्या दिवशीच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Web Title: Mns Leaders Will Enter In Shivsena On 22nd May In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..