Loksabha 2019 ः मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेत?

 Loksabha  2019 ः मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेत?

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे लवकरच पक्ष सोडण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर शरद सोनवणे हे आपल्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद सोनवणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले असल्याचीही माहिती आहे. 

मनसेचे आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करणार. याबाबत सोनवणे यांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे. आमदारांनी दिल्लीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली. अशी चर्चा सोशल मीडियातून सुरू आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नारायणगाव येथे आज कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक झाली.

दरम्यान, शरद सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास अंतर्गत नाराजीचा सामना त्यांना करावा लागू शकतो. "सेनेचा खासदार होतो; आमदार का नाही' आमदारांनी मागील पाच वर्षांत सर्व पक्षांना खेळवले आहे. शिवसेनेचा खासदार होता होते, मग आमदार का होत नाही, अशी शंका उपस्थित जुन्नर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. पक्षाला त्रास दिलेल्या व्यक्तीची उमेदवारी सहन केली जाणार नाही, असेही म्हटले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com