कोथरूडमध्ये साड्या वाटू देणार नाही; मनसेचे चंद्रकांत पाटलांना 'चॅलेंज'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 October 2019

पाटील यांनी साड्या वाटण्याचा प्रयत्न केला तर, मनसे स्टाईल प्रत्युत्तर देण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

पुणे : कोथरूडमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांना साड्या वाटू देणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केले आहे. पाटील यांनी साड्या वाटण्याचा प्रयत्न केला तर, मनसे स्टाईल प्रत्युत्तर देण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
 
स्वाभिमान विकत घेऊ पाहत आहात
या बाबत मनसेच्या कोथरूड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,' कोल्हापूरच्या धर्तीवर येथेही खालच्या पातळीवर राजकारण सुरू झाले आहे, अशी चर्चा कोथरुडच्या जनतेमध्ये आहे. एक तर, कोथरूडकरांना गृहीत धरून तुम्ही इथे आलात आणि आता आमचा स्वाभिमान तुम्ही विकत घेऊ पाहत आहात? कोथरूडकर जनतेला आज तुम्ही साड्या वाटणार आणि पाच वर्षे वाटाण्याच्या अक्षदा देणार हे नकळण्या इतके कोथरूडकर सूज्ञ नाहीत असे तुम्हाला वाटते का?

'आमदाराचे काम चंद्रकांत पाटील यांना समजत नाही'
  

हा तर आचारसंहितेच भंग
पाटील यांनी अजून आमदारकीची शप्पथ ही घेतली नाही, ना त्यांना अजून मंत्रिपद मिळाले आहे आणि या आधीच एक लाख साडी वाटप करणे हा सरळ सरळ आचार संहितेचा भंग आहे. मतदारांना साड्या वाटून पूर्ण करत आहेत, असे दिसते.

 कोथरूडमधील बहिणींना साड्या वाटणारच : चंद्रकांत पाटील

मनसे कोथरूड विभागाच्या वतीने ह्या संदर्भात मुख्यनिवडणूक आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच तक्रार देणार आहे, व चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करत त्यांची कोथरूड मधील निवड ही रद्द करावी अशी मागणीही करणार आहोत.' महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूडकर जनतेला आवाहन करू इच्छितो की आशा घाणेरड्या वृत्तीचा निषेध करत कोणीही भिकरूपी दिलेली साडी स्वीकारू नये. तसेच असं साडी वाटप करताना कोणीही मनसे च्या निदर्शनात आल्यास मनसे स्टाईल ने ह्या सर्व गैरवरकाराचा विरोध केला जाईल व ह्या सर्व प्रकारची जवाबदारी मनसे ची नसेल असे जाहीर करतो, असे धावडे यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns oppose chandrakant patil saree distribution in kothrud