मनसेकडून साहित्यिकांच्या "रॅली' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - मराठी सिनेकलाकारांसह साहित्यिक, कवी आणि नाट्य कलाकारांची रॅली काढून मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा फंडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयार केला आहे. प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र प्रचार यंत्रणा असेलच आणि त्यासोबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा व अन्य प्रभावशाली व्यक्तींच्या रॅलींचे नियोजन करण्यात येत आहे. 

निवडणुकीसाठी अर्ज व अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रचाराने वेग घेतला आहे. रविवारचा मुहूर्त साधून अनेक मनसेच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. प्रभागनिहाय उमेदवारांचे काम, विकासकामांचे व्हिजन आणि पक्षाची भूमिका मतदारांसमोर मांडून उमेदवार मते मागत आहेत. 

मनसेच्या प्रचार नियोजनाची माहिती देताना शहराध्यक्ष हेमंत संभूस म्हणाले, ""सध्या  पदयात्रांवर भर देण्याचे ठरविले आहे. त्यानंतर रॅली काढण्यात येणार आहे. प्रचार करताना प्रभागातील सर्व उमेदवार यात सामील असतील. या व्यतिरिक्त राज ठाकरे यांच्या अधिकाधिक सभा शहराच्या विविध भागांत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सभांचे नियोजन 10 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. संपूर्ण शहरासाठी एक मोठी सभासुद्धा घेण्यात येईल. प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागांपैकी सभांसाठीच्या जागा निश्‍चित करण्यात येत आहेत.'' 

""सिनेकलाकारांच्या रॅली काढण्याचेही नियोजन केले जात आहे. त्यांच्या सोबत नाट्य कलाकार आणि साहित्यिकांच्या रॅलीही असतील,'' असेही संभूस यांनी सांगितले. 

Web Title: MNS rally