Kasba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकी संदर्भात मनसेची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काँग्रसे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंब्याचा विश्वास आहे. कसबा पोटनिवडणुकीबाबत मनसे शनिवारी अधिकृत भूमिका जाहीर करणार असून शहर कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे मनसे भाजपला पाठिंबा देणार का तठस्थ राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर यांनी मनसे महाविकास आघाडीलाच पाठिंबा देईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
धंगेकर म्हणाले, "पुणे शहरात माझे अनेक मित्र आहेत आणि भाजपमध्ये पण माझे मित्र आहेत आणि त्यांना माहिती आहे की रवींद्र धंगेकर हा कार्यकर्ता आहे त्यामूळे भाजपसुद्धा मला मदत करेल."
मनसे पाठिंबा देईल का असे विचारताच, धंगेकर यांनी, "हा प्रश्न आहे का. सहकारी आहेत माझे, मलाच पाठिंबा देणार"
शिवसेनेत मतभेद-
कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेना कुणाच्या पाठीशी उभी राहणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्ररक्षक असलेल्या विशाल धनवडे यांची नाराजी आली समोर आली आहे. शहराध्यक्ष यांच्यासोबत झालेल्या वादात धनवडे राजीनामा देण्याची शक्यता
विशाल धनवडे उद्या संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या मतभेदाचे व्हॉटसॲप मेसेज समोर आले आहेत.
"मी ही राजीनामा देतो, एक शिवसैनिक म्हणून काम करत राहू", असा धनवडे यांचा व्हॉटसअप मेसेज व्हायरल होत आहे. विशाल धनवडे हे शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी धनवडे हे इच्छूक होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.