Kasba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मतभेद? पाठिंबा देण्याबाबत अस्पष्टता

Kasba Bypoll Election
Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election : पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. ही पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेली निवडणूक आहे. ही निवडणूक होणार की बिनविरोध निवड होणार, अशी चर्चा असतांना अखेर निवडणूक पार पडत आहे. महाविकास आघाडीनेही उमेदवार देत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. दरम्यान काँग्रेस आणि भाजपनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेतील नाराजी समोर आहे. 

कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेना कुणाच्या पाठीशी उभी राहणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्ररक्षक असलेल्या विशाल धनवडे यांची नाराजी आली समोर आली आहे. शहराध्यक्ष यांच्यासोबत झालेल्या वादात धनवडे राजीनामा देण्याची शक्यता आहे.

विशाल धनवडे  उद्या संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या मतभेदाचे व्हॉटसॲप मेसेज समोर आले आहेत. "मी ही राजीनामा देतो, एक शिवसैनिक म्हणून काम करत राहू", असा धनवडे यांचा व्हॉटसअप मेसेज व्हायरल होत आहे. विशाल धनवडे हे शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी धनवडे हे इच्छूक होते. 

Kasba Bypoll Election
Pravin Togadia : मशिदींवरील भोंग्यावरुन हिंदू परिषदेच्या अध्यक्षानं राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, आता कुठं गेलं..

मनसे तळ्यात-मळ्यात

कसबा पोटनिवडणुकी संदर्भात मनसेची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काँग्रसे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंब्याचा विश्वास आहे. कसबा पोटनिवडणुकीबाबत मनसे शनिवारी अधिकृत भूमिका जाहीर करणार असून शहर कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे मनसे भाजपला पाठिंबा देणार का तठस्थ राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर यांनी मनसे महाविकास आघाडीलाच पाठिंबा देईल असा विश्वास व्यक्त केला आहे. "पुणे शहरात माझे अनेक मित्र आहेत आणि भाजपमध्ये पण माझे मित्र आहेत आणि त्यांना माहिती आहे की रवींद्र धंगेकर हा कार्यकर्ता आहे त्यामूळे भाजपसुद्धा मला मदत करेल." मनसे पाठिंबा देईल का असे विचारताच, धंगेकर यांनी, "हा प्रश्न आहे का. सहकारी आहेत माझे, करणारच मला.."

Kasba Bypoll Election
Nana Patole : नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? पक्षश्रेष्ठींकडून थोरात प्रकरणाची गंभीर दखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com