पवारांच्या बालेकिल्ल्यासाठी मनसेची रणनीती; वसंत मोरेंवर सोपवली महत्वाची जबाबदारी

मोरे मनसेवर नाराज असल्याची चर्चा होती पण आता त्याच मोरेंवर मनसेनं महत्वाची जबाबदारी सोपवलीए
raj thackeray vasant more
raj thackeray vasant moreSakal

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता येत्या काळात पार पडणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पुण्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर मनसेनं लक्ष केंद्रीत केलं असून याची जबाबदारी वसंत मोरेंवर सोपवण्यात आली आहे. राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांचा मुद्द्याला हात घातल्यानंतर यावर वसंत मोरे नाराज होते. पण आता त्याच मोरेंवर मनसेनं महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. (MNS strategy for Pawar stronghold Imp responsibility entrusted to Vasant More aau85)

raj thackeray vasant more
Manish Sisodia: मनीष सिसोदियांसारख्या व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवा - केजरीवाल

मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत मोरेंवरील जबाबदारीबाबत निर्णय झाला. या निर्णयानुसार, मनसे नेते वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली वसंत मोरेंना ही नवीन जबाबदारी दिली आहे.

raj thackeray vasant more
DA Arrears: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना काळातील थकीत 'महागाई भत्ता'

गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेत नसल्याचे दिसत होते. पण आता नाराज असलेले मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

raj thackeray vasant more
Monsoon Session : मी नवीन प्लेअर, संभाळून घ्या; मंगलप्रभात लोढांची विरोधकांना साद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने पुणे ग्रामीणमधील मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार, किशोर शिंदे, हेमंत संभुस, गणेश सातपुते यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघ तर वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com