
ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असतानाच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. कोर्टाने आरक्षण न देताच निवडणुका घेण्याचं जाहीर केलंय. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यातच निवडणुकांआधी राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने राजकीय नाट्य रंगलंय.
राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या प्रकरणावरून रान उठवलं आहे. ठाकरेंनी मुंबई, ठाण्यानंतर औरंगाबादमध्ये सभा घेतली. यादरम्यान त्यांनी दोन वेळा पुण्यात बैठकी घेतल्या. यामुळे राजकीय वातावरण गरम झालं आहे. त्यातच आता पुण्यात रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर मेळावा पार पडणार आहे.(MNS Meeting in Pune)
औरंगाबादच्या सभेनंतरही राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुणे दौरा केला. त्यानंतर आता मनसेच्या गोटातून आणखी एक माहिती समोर येत आहे. शहर स्तरावर पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. साईनाथ बाबर शहर अध्यक्ष झाल्यानंतर मनसेचा पहिलाच जाहीर मेळावा होणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची रणनिती ठरणार आहे. शहरातील मनसे नेते, पदाधिकारी, शाखा अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्ते मेळाव्यात उपस्थित राहतील. मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.