ऑनलाइन स्कुल फीसाठी निश्चित धोरण ठरवावे : कोणी केली शालेय शिक्षण मंत्र्यांना मागणी?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

पुणे शहरातील असंख्य शाळा पालकांवर दबाव निर्माण करून फी वसुली करत आहेत. त्यामुळे पालकांवर नाहक आर्थिक बोजा निर्माण होत असून, त्यातून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन शाळांसाठी देखील या शाळा नियमित शाळांच्याप्रमाणे शुल्क आकारणी करत आहेत​

पुणे : राज्यभरात सध्या ऑनलाईन शाळांची लगबग सुरू आहे. अशात काही शाळा पालकांवर शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत. विद्यार्थी प्रत्यक्षात शाळांमध्ये जात नसले तरी, नियमित शाळेप्रमाणे शुल्क आकारणी केली जात आहे. अशा तक्रारी पालकांकडून होत आहेत, त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने आता ऑनलाईन शाळांबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पुणे शहरातील असंख्य शाळा पालकांवर दबाव निर्माण करून फी वसुली करत आहेत. त्यामुळे पालकांवर नाहक आर्थिक बोजा निर्माण होत असून, त्यातून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन शाळांसाठी देखील या शाळा नियमित शाळांच्याप्रमाणे शुल्क आकारणी करत आहेत. परिणामी असंख्य विद्यार्थी शिक्षण पासूनच वंचित राहण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे या शाळांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.तसेच पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावनाऱ्या शाळांची यादी देखील मंत्र्यांकडे दिल्याची माहिती यादव यांनी दिली.

Video : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ!

सध्या शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना देणार असल्याचे देखील गायकवाड यांनी यादव यांना या चर्चे दरम्यान सांगितले आहे. 
 

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNVS demands that a definite policy be levied on online school fees