कांदळीत मोबाईल दवाखाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पिंपळवंडी - कांदळी (ता. जुन्नर) येथे सरपंच विक्रम भोर आणि अनंतराव कणसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने मोबाईल दवाखाना ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याचे उद्‌घाटन आज सकाळी उद्योजक यशवंत गुंजाळ व सरपंच भोर यांच्या हस्ते करण्यात आले. 

समाजोपयोगी योजना ग्रामपंचायतीने राबवून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाव्यात, अशी सूचना करून उद्योजक यशवंत गुंजाळ यांनी दवाखान्याचे साहित्य खरेदीसाठी रोख रक्कम अकरा हजार रुपयांची देणगी दिली.

औषधोपचार व इतर खर्च दानशूरांच्या देणगीतून भागविला जाणार आहे. दर मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत मोफत बाह्यरुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. महिनाच्या पहिल्या मंगळवारी कांदळी गावठाण, दुसरा मंगळवार सुतारठिके, तिसरा मंगळवार नगदवाडी, चौथा मंगळवार चौदा नंबर येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. परेश जोशी यांनी दिली. या फिरत्या दवाखान्याचा लाभ कांदळी ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन सरपंच विक्रम भोर यांनी केले. या वेळी डॉ. अंकिता खंडागळे, डॉ. प्रियंका चव्हाण, डॉ अश्विनी विश्वासराव, जनसंपर्क अधिकारी शरद भुजबळ, उपसरपंच सुदर्शन बढे, सदस्य अनिल भोर, लक्ष्मी बढे, जया शिंदे, छाया गोपाळे, सुनंदा गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, पिराजी भोर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कांदळी ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली डिजिटल ग्रामपंचायत बनलेली आहे.

Web Title: mobile hospital in kandli