लूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का

प्रफुल्ल भंडारी
Sunday, 27 September 2020

पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

दौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 
दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी या बाबत माहिती दिली. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण (दोघे रा. बोरावकेनगर, गोपाळवाडी, ता. दौंड), अक्षय कोंडक्‍या चव्हाण (रा. माळवाडी, लिंगाळी, ता. दौंड), नेपश्‍या पिराजी काळे (रा. राक्षशवाडी, ता. कर्जत, जि. नगर) व एक मुलगा अशा पाच जणांच्या टोळीवर कारवाई करण्यात आली.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनच्या काळात 30 मार्च रोजी या टोळीने मळद (ता. दौंड) येथे ट्रकचालक काशिनाथ रामभाऊ कदम (वय 55, रा. ढोकी, जि. उस्मानाबाद) यांचा खून केला होता. तर एका टेंपो मदतनीसावर चाकूने वार केले होते. या खून व लूटमारीचा तपास दौंड पोलिस व पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तरीत्या करीत काही आरोपींना अटक केली होती. निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह सहायक निरीक्षक हृषिकेश अधिकारी, सहायक फौजदार दिलीप भाकरे, पोलिस नाईक सचिन बोराटे व कॉन्स्टेबल नारायण वलेकर यांनी सहकार्य केले. 
 

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली
येरवड्यातून पळाले होते, पण... 
पुण्यातील येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून 16 जुलै रोजी टोळीतील देवगण चव्हाण, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण व अन्य दोन, असे एकूण पाच कैदी खिडकीचे गज उचकटून पळून गेले होते. त्यापैकी पुणे येथून लोहमार्गावरून पायी दौंडला आलेल्या गणेश व देवगण चव्हाण यांना पोलिसांनी शिताफीने पकडले होते. या टोळीतील अक्षय चव्हाण व नेपश्‍या काळे हे दोन आरोपी फरारी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mocca action against gang