कोरोनानंतर कसं असणार कॉलेजमधील वातावरण? इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सांगितली त्यांची संकल्पना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

- मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पुढाकाराने कोरोनाबाबतची जनजागृती मोहीम
- महाविद्यालये उघडल्यावर घ्यावयाची काळजी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर याबाबत जनजागृती 
- व्हिडिओमार्फ़त देत आहेत माहिती
- उपक्रमात शहरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील (एमसीओई) विद्यार्थ्यांनी नुकताच 'अनलॉक : इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून' हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालय पुन्हा सुरू झाल्यावर घ्यावयाची काळजी तसेच सध्याच्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतील, यावर जनजागृती करणारी चित्रफीत तयार करण्यात आली आहे. 

पोलिसांच्या या कामाला सॅल्यूट कराच...माळरानावर बहरणार नंदनवन​

याबाबत माहिती देताना महाविद्यालयातील अर्चि रोटे ही विद्यार्थिनी म्हणाली, "सध्या काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. पुढील काळात जर महाविद्यालये पुन्हा सुरू झाली तर विद्यार्थ्यांनी कशी आणि काय खबरदारी घ्यावी, यासाठीच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्याची संकल्पना सुचली. याबाबत महाविद्यालयातील आमच्या आयटी शाखेच्या विभागप्रमुखांशी संपर्क केला. त्यांनी देखील यासाठी परवानगी दिली. त्यानंतर आम्ही शहरातील इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांशी संपर्क करून तेथील विद्यार्थ्यांना पण या उपक्रमात सहभागी करून घेतले.

सीताफळांची परदेश वारी यंदा खडतर​

यामध्ये फक्त आयटी शाखेचेच नाही, तर वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी आपापली मते तसेच खबरदारीसाठी उपाययोजना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाईल, याबाबत व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. तसेच डिजिटल माध्यमाचा वापर करून उत्पन्नास कशी चालना मिळेल आणि लोकांनी घराबाहेर पडताना किंवा 'न्यू नॉर्मल'च्या या जीवनशैलीमध्ये काय खबरदारी घ्यावी, यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे."

हा उपक्रम एमसीओईच्या प्राचार्य कल्याणी जोशी आणि आयटी शाखेच्या विभाग प्रमुख सरिता देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. तसेच देशातील इतर युवकांनी देखील अशा प्रकारच्या उपाययोजना सुचवाव्यात, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचा हेतू असल्याचे अर्चिने सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modern Engineering College students launched the Unlock From the Perspective of Engineering initiative