
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा महामार्ग पोलिस मदत केंद्रातील वाहतूक पोलिस वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण यांसारख्या कामातून आपल्या मातृभूमीची सेवा करत आहेत.
पोलिसांच्या या कामाला सॅल्यूट कराच...माळरानावर बहरणार नंदनवन
सातगाव पठार (पुणे) : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा महामार्ग पोलिस मदत केंद्रातील वाहतूक पोलिस वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण यांसारख्या कामातून आपल्या मातृभूमीची सेवा करत आहेत. उजाड माळरानावर तब्बल 151 प्रकारची झाडे लावून माळरानाचे नंदनवन करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांच्यासह त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत.
प्रत्येक बारामतीकराची आजपासून होणार तयारी
पेठ (ता. आंबेगाव) येथे पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अवसरी घाट वन उद्यानाजवळील डोंगरावर आळेफाटा महामार्ग पोलिसांचे मदत केंद्र आहे. या ठिकाणी झाडे अतिशय फारच कमी प्रमाणात होती. उन्हाळ्यात उन्हाच्या झळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाणवत होत्या. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी आपल्या सहकाऱ्यांना या ठिकाणी झाडे लावू, असा विचार सांगितला. लगेचच सहकाऱ्यांनी होकार देताच मंचर वनविभाकडून 151 विविध प्रकारची झाडे त्यांनी मिळवली. यामध्ये चिंच, वड, आंबा, आवळा, लिंब, जांभूळ, निलगिरी, पिंपळ, बांबू, बेल, रामफळ आदी विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.
न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई
झाडे मिळताच लगेचच स्वतः सर्वांनी श्रमदान करत डोंगरावर खड्डे घेत या खड्डयांमध्ये वृक्षरोपण केले. पावसाळ्याच्या सुरवातीलाच ही झाडे लावली, मात्र पाऊस झाला नाही. मग टँकरने पाणी आणून झाडांना पाणी दिले. भविष्यात परत या झाडांना पाणी कमी पडू नये, यासाठी येथे शेततळे देखील तयार केले. तसेच, सर्व झाडांना ठिबक सिंचनची सोय देखील करून ठेवली. त्यामुळे या झाडांना पाणी वेळेवर मिळणार आहे. या सर्व कामी पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांना त्यांचे सहकारी दादासाहेब मोसे, बाळासाहेब सुरकुले, माणिक मांडगे, शंकर कोढरे, प्रकाश नेटके, पोलिस नाईक योगेश गायकवाड, संदीप सूर्यवंशी, अरुण उबाळे, विलास कोंढवळे व इतर सर्व कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही रस्त्यावर उभे राहून काम करत असतो. त्याचबरोबर वृक्षरोपण व वृक्षसंवर्धान ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही 151 झाडे लावत ती जगवण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपण निसर्गाचे काही तरी देणेकरी आहोत, या भावनेतून, कर्तव्यातून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करावे, असे मत पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी व्यक्त केले.
Web Title: Tree Planting Initiative Alephata Highway Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..