‘सायबर फेअर’मध्ये ‘मॉडर्न’ला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

इंटरनेटचा अतिरिक्त वापर व वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जागृती घडविण्यासाठी झालेल्या ‘सायबर फेअर’ या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद गणेशखिंड रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलने पटकाविले.

पुणे - इंटरनेटचा अतिरिक्त वापर व वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जागृती घडविण्यासाठी झालेल्या ‘सायबर फेअर’ या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद गणेशखिंड रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलने पटकाविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंख संस्था, क्विक हिल फाउंडेशन व पुणे शहर पोलिसांतर्फे शिक्षण प्रकल्पांतर्गत ‘सायबर फेअर’ हा स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शाळांगण व जीवनमूल्य प्रशिक्षण प्रकल्प सुरू असणाऱ्या अकरा शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतला. कसबा पेठेतील रतनबेन चुन्नीलाल गुजराती महाविद्यालयात पारितोषिक वितरण झाले. या वेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चनसिंह, अभिनेते अजय पूरकर, क्विक हिल टेक्‍नॉलॉजीचे अध्यक्ष कैलास काटकर, सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे, निरीक्षक मच्छिंद्र पंडित, पंख संस्थेच्या अध्यक्षा स्मिता आपटे, विश्‍वस्त कल्याणी भाबड, सीमा ननावरे, सहायक पोलिस निरीक्षक सागर पानमंद, परीक्षक कुलदीप दगडे उपस्थित होते.

‘सायबर फेअर’मध्ये निबंध लेखन, घोषवाक्‍य, पोस्टर, नाटिका, रॅप, एकपात्री अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यासाठी ‘इंटरनेट शाप की वरदान’, ‘इंटरनेटचे फायदे व तोटे’, ‘इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदारीने वापर’ यांसारख्या विषयांचा समावेश होता. सहभागी झालेल्या व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ व विशेष बक्षिसे देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modern highschool win in cyber fare competition