पोलिसांना अत्याधुनिक गाड्या

interceptor-vehicle-police
interceptor-vehicle-police

पुणे -  राज्यातील अपघातांची वाढती संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाकडून आधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेइकल’ खरेदी केली आहेत. लेझर तंत्रज्ञानावरील स्पीडगन, ई-चलन यंत्रणा, मद्यापींवरील कारवाईसाठी ब्रेथ ॲनलायजर यांसारख्या अनेक सुविधा या वाहनात असणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० ऑक्‍टोबरपर्यंत ९६ ‘इंटरसेप्टर वाहने’ राज्यातील पोलिसांना दिली जाणार आहेत. 

पाषाण येथील पोलिस संशोधन केंद्रात शनिवारी वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगांवकर व पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते या वाहनाचे वितरण करण्यात आले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे  प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, बिनतारी संदेश विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस अधीक्षक (मुख्यालय) विजय पाटील, महामार्ग पोलिस दलाच्या पुणे विभागाचे अधीक्षक मिलिंद मोहिते या वेळी उपस्थित होते. दिल्ली पोलिस दलात ‘इंटरसेप्टर व्हेइकल’चा वापर करण्यात येत आहे. त्यातून अपघात कमी करण्यात यश येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी ही वाहने खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस आयुक्तालये, ग्रामीण पोलिस मुख्यालयांना प्रत्येकी दोन ते तीन ‘इंटरसेप्टर व्हेइकल’ टप्प्याटप्प्याने दिले जाणार असल्याचे कारगावकर यांनी सांगितले. 

नागरिकांच्या सहकार्यामुळे ३५ टक्के अपघात कमी केले असून, हे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपर्यंत न्यायचे लक्ष आहे. पुणे पोलिसांना दोन वाहने देण्यात आली असून दोन लवकरच मिळतील. 
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com