पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशी आर्चन पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसानिमित्त  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशी आर्चन पूजा
Published on

PNE26W50567
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची तुळशी अर्चना - पूजा करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी - कार्यकर्ते.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तुळशी अर्चना

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर पूर्व जिल्हा भाजपच्या वतीने गुरुवारी (ता. १७) पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तुळशी अर्चना व पूजा करण्यात आली. ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेतून देशसेवा करणाऱ्या मोदी यांच्याप्रती या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र सुरवसे, भाजपचे नगरपालिकेतील गटनेते भागवत बडवे, नगरसेवक सौरभ थिटे, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, मनोज सुरवसे, भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस अनुप देवधर, उपाध्यक्ष अजित लेंडवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक सौरभ थिटे यांनी या तुळशी अर्चना व पूजेचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com